कोलकाता :
अनिल अग्रवाल यांची कंपनी वेदांता लिमिटेडची सहकारी कंपनी हिंदुस्थान झिंक यांनी आर्थिक वर्ष 2023-24 करीता 7 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीच्या समभागधारकांना याचा लाभ होणार आहे. वेळोवेळी नियमीत लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये हिंदुस्थान झिंकचा उल्लेखही आदराने घेतला जातो. कंपनीने याचवर्षी जानेवारीत 13 रुपये आणि मार्चमध्ये 26 रुपये लाभांशाची घोषणा केली होती.









