वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडला टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या भागीदारीत मध्यप्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमपीएमआरसीएल) कडून 2,191 कोटी रुपयांचे कंत्राट प्राप्त झाले आहे. 2,191 कोटी रुपयांचा हा कंत्राटाचा करार एमपीएमआरसीएलसाठी भूमिगत बोगदे आणि स्थानके असलेल्या 8.65 किमी लांबीच्या कॉरिडॉरच्या बांधकामासाठी आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
संयुक्त उपक्रमात एचसीसीची 55 टक्के हिस्सेदारी
एचसीसी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जसप्रीत भुल्लर म्हणाले, ‘आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की एचसीसीला टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड सोबत 55:45 संयुक्त उपक्रमांतर्गत इंदूर मेट्रो रेल प्रकल्पासाठी 2,191 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे’.
या अंतर्गत 8.65 किमी लांबीचा कॉरिडॉर बांधला जाईल. यामध्ये मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी भूमिगत बोगदे आणि स्थानके बांधण्याचा समावेश आहे. 31.32 किमी लांबीच्या इंदूर मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यातील हा एकमेव भूमिगत भाग आहे.
इंदूर मेट्रोच्या भूमिगत विभागात 7 भूमिगत स्थानके
आयएन-05आर हा पॅकेज 31.32 किमी लांबीच्या इंदूर मेट्रो फेज-1 प्रकल्पातील पहिला आणि एकमेव भूमिगत भाग आहे. याअंतर्गत, 11.32 किमी लांबीचे बोगदे टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) वापरून बांधले जातील आणि सात भूमिगत स्थानके बांधली जातील. हा कॉरिडॉर इंदूर रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील रॅम्पला विमानतळ स्टेशनच्या पश्चिमेकडील रॅम्पशी जोडण्यात येणार आहे.









