हिंदू राष्ट्रसेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई : कडोली येथे जागो हिंदू मेळावा उत्साहात

वार्ताहर /कडोली
हिंदू धर्म हा जगात सर्वश्रेष्ठ धर्म असून हिंदू धर्माशी फितुरी आणि प्रतारणा करणाऱ्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेचून काढले होते. अशीच काही दृष्ट मंडळींनी गरळ ओकून हिंदूंच्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांना मतांच्या माध्यमातून वेळीच बाहेर काढणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदू राष्ट्रसेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांनी केले.
कडोली येथे रविवारी रात्री आमराईत आयोजित करण्यात आलेल्या जागो हिंदू मेळाव्यात प्रमुख वक्ते या नात्याने धनंजयभाई देसाई बोलत होते. ते पुढे म्हणाले, हिंदू धर्म हा असा एक धर्म आहे, तो सर्वांना सामावून घेऊन वाटचाल करणार आहे. हिंदू धर्माबद्दल जगात आदराचे स्थान प्राप्त झाले असताना भारतात मात्र हिंदूवाद निर्माण करून फूट पाडण्याचे कटकारस्थान रचले जात आहे, असे सांगितले.
यावेळी घालवाड अधिपती नाथ संस्थानचे योगी बाल महाराज, क्यारगुडचे स्वामी अभिनव मंजुनाथ यांनीही हिंदू धर्माची व्याख्या अत्यंत चांगल्यारितीने मांडली.
प्रारंभी कडोली ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर छ. शिवाजी महाराज आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रीनिवास रे•ाr यांनी सूत्रसंचालन केले. मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी गर्दी केली होती.









