समितीचे समन्वयक मनोज खाड्यो यांची माहिती
बेळगाव : आपल्या देशात अल्पसंख्याक आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्याक विकास मंत्रालय आहे. पण हिंदूंना संरक्षण देणारे कोणतेही मंत्रालय किंवा आयोग नाही. अल्पसंख्यांकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान मिळते तर हिंदुंना का मिळत नाही. मंदिराचे तेवढेच सरकारीकरण का होते? असे अनेक प्रश्न आहेत. त्या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी 19 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता शहापूर पोलीस स्थानकानजीक हिंदू राष्ट्र जागृती सभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक मनोज खाड्यो यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, सभेत धर्मप्रसारक स्वाती खाड्यो, अधिवक्ता संघटक निलेश सांगोलकर यांचे भाषण होणार आहे. सभेच्या निमित्ताने प्रचार सुरू असून ठिकठिकाणी बैठका घेण्यात येत आहेत. निवेदन, आंदोलन, धर्मशिक्षणवर्ग या माध्यमातून जनजागृतीही सुरू आहे. याप्रसंगी समितीचे जिल्हा समन्वयक ऋषिकेश गुर्जर, कर्नाटक राज्य समन्वयक गुरूप्रसाद गौडा उपस्थित होते.









