ऑनलाईन टीम / तरुण भारत :
हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी कसबा विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपने टिळक कुटंबात उमेदवारी न दिल्यामुळे ब्राह्मण समाजात नाराजीचा सुरू आहे. त्यामुळे भाजपची फुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, हाच मुद्दा उचलून धरत आता हिंदू महासंघाने भाजपविरोधात दंड थोपटले आहेत.
कसबा पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबियांना डावलत हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंदू महासंघाकडून आनंद दवे यांनी ही निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने भाजप आणि काँग्रेसचीही डोकेदुखी वाढली आहे. आनंद दवे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार असल्याचे दवे यांनी जाहीर केले आहे.
अधिक वाचा : मशिदींसाठी वक्फ बोर्ड, मग मंदिरांसाठी हिंदू बोर्ड का नाही?
हिंदू महासंघासोबतच संभाजी ब्रिगेडनेही आपला उमेदवार दिल्याने कसबा विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळली आहे.









