धर्मांतर बंद व्हायला हवे, लव्ह जिहादवर बंदीचा कायदा करा, या आणि अशा विविध मागण्यांसह पुण्यामध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतामध्ये लव्ह जिहादवर बंदी घालावी, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आला. या मोर्च्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosle) यांच्यासह तेलंगणाचे आमदार राजाभैया (MLA Rajabhaiya) उपस्थित होते. तेलंगणाचे आमदार राजा भैय्या यांनी या मोर्च्याच्या माध्यमातून केली.
देशातील अनेक तरुण- तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जात आहे. या युवकांना लव जिहादच्या नावाखाली फसवले जात आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत लव्ह जिहादच्या नावाखाली एका मुलीचे ३५ तुकडे करून मारण्यात आले. त्यामुळे अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी या कायद्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना आमदार राजा भैया म्हणाले, भारतामध्ये अनेक ठिकाणी बलात्काराच्या घटना घडत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या दिवशी देशासाठी आहुती बलिदान दिले तो दिवस संपूर्ण भारतात बलिदान दिन म्हणून घोषित करावा. या मागणीसाठी पुण्यात मोर्चाचे नियोजन करण्यात आले. पुढील काळात गो- हत्या, लव- जिहाद आणि धर्मांतर या विषयी कायदा झाला नाही, तर संपूर्ण भारतभर अशा प्रकारचे मोर्चे निघतील असा इशारा आमदार राजा भैय्या यांनी दिला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबत विचार करावा असे आवाहनही त्यांनी केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








