हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांकडे मागणी
प्रतिनिधी / पणजी
हिंदु ग्राहकांना सक्तीने ‘हलाल’ अन्नपदार्थ दिले जाऊ नयेत, तसेच हिंदु समाजासाठी ‘हलाल नसलेले’ अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांकडे एका निवेदनाद्वारे केली आली. यावेळी समितीच्या शिष्टमंडळामध्ये ‘भारत माता की जय’ संघटनेचे प्रा. मुकुंद कवठणकर आणि सुरेश डिचोलकर, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, ‘शिव प्रति÷ान’चे मंदार गावडे, ‘वीर सावरकर’ संघटनेचे सर्वश्री अरू ण नाईक, राष्ट्रीय हिंदू वाहिनीचे उत्तर गोवा समन्वयक सुभाष कुशवाह, हिंदुत्वनि÷ लक्ष्मीकांत केरकर, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत आदींचा समावेश होता.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या अंतर्गत ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण, तसेच प्रत्येक राज्यात स्वतंत्र अशी ‘अन्न आणि औषध प्रशासन’ विभाग अस्तिवात असताना सध्या भारतीय मुसलमानांकडून केवळ मांसच नव्हे, तर धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे, आदी उत्पादनेही इस्लामनुसार वैध अर्थात ‘हलाल’ नामांकित असावी, अशी मागणी करण्यात येत आहे. देशातील केवळ 15 टक्के असणाऱया मुसलमान समाजाला इस्लामसंमत ‘हलाल’ खाण्यास द्यायचे आहे, म्हणून 85 टक्के समाजावर ‘हलाल’ का लादण्यात येत आहे ?केवळ धर्माच्या आधारावर निर्मिलेली ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था अन्य समाज घटकांवर लादण्यात येत आहे. हे धार्मिक अधिकारांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे धार्मिक भेदभाव करणाऱया ‘हलाल सर्टिफिकेशन’वर भारतात बंदी आणावी. ज्या खासगी आस्थापनांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची अनुमती देण्यात आली आहे, त्या सर्व आस्थापनांची अशी अनुमती त्वरित रहित करण्यात यावी. ज्या संस्था ‘हलाल सर्टिफिकेशन’ देतात, त्या सर्व संस्थांची सीबीआयद्वारे चौकशी करून या निधीचा वापर आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी झाला का ? याद्वारे राष्ट्रीय सुरक्षेला काही धोका नाही ना ? याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे डॉ. मनोज सोलंकी यांनी केली.









