सावंतवाडी : प्रतिनिधी
सिं.जि.शि.प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी मध्ये गुरूवार दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आकर्षक पद्धतीने सुशोभित केलेल्या मंचावर हिंदी भाषारूपी रोपटयास मराठी, उर्दू, बंगाली, गुजराथी, पंजाबी आदि भाषारूपी कलशातील पाणी घालून वेगवेगळया भाषांचे हिंदी भाषेमध्ये सम्मिलन घडवून कार्यक्रमाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा. कविता तळेकर यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. विदयार्थ्यांनी कविता गायन व कविता वाचन सादर केले.. यानंतर कु. प्रांजल परब व कु. भार्गवी बुवा या विदयार्थीनींनी एकपात्री अभिनय सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
हिंदी निबंध स्पर्धेमधील विजेत्या विदयार्थ्यांना उपयुक्त पुस्तके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा. कविता तळेकर यांनी विदयार्थ्यांना संबोधित केले. हिंदी भाषेचे महत्त्व, आवश्यकता, समाजातील स्थान इ. बद्दल त्यांनी आपले विचार ओघवत्या शैलीत व्यक्त केले. मा.प्रा. कविता तळेकर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्नेहपूर्ण भेट देऊन त्यांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इ. नववीतील विदयार्थीनी कु. युक्ता सापळे हिने केले तर आभार प्रदर्शन प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीम. श्रुती जोशी यांनी केले. यावेळी पाचवी ते दहावी पर्यंतचे विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोसले, विश्वस्त युवराज्ञी श्रदधाराजे भोसले व संस्थेचे सदस्य, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर यांनी शुभेच्छा दिल्या.









