मोरजी : इंग्रजी ही ज्ञान भाषा असली तरी हिंदी ही भारतीयांच्या हृदयाची भाषा आहे .ती भारतीयांना एकतेच्या सूत्रात बांधते असे प्रतिपादन म्हापसा येथील सेंट झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक दिलीप धारगळकर यांनी केले. कोरगाव येथील श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कशालकर , स्टार इव्हेंट सालीगावचे प्रदीप सावंत, श्री कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ऍड शाम शेट्यो, उपाध्यक्ष कृष्णा गावडे, सचिव निलकंठ थळी, प्राचार्य सौ जुही थळी ,विठोबा बगळी, विध्यार्थी प्रमुख कु आसावरी शेट्यो आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.धारगळकर म्हणाले,हिंदी भाषेमुळे आम्ही भारतीय एकतेच्या आणि आत्मीयतेच्या सूत्रात बांधलो गेलो आहोत.या भाषेबद्दल आम्हाला अभिमान बाळगायला हवा दैनंदिन जीवनात आपण तिचा वापर करायला हवा तरच आपल्या भारतीय संस्कृतीचा सांभाळ करू शकू असे ते म्हणाले. अध्यक्षस्थानावरून बोलताना ऍड. शाम शेट्यो म्हणाले, हिंदी भाषा ही आपली भाषा आहे तिला सन्मान ती कार्यालयीन भाषा म्हणून नोंद आहे परंतु आपण जास्तीत जास्त इंग्रजीचा वापर करतो.हे चित्र आपण बदलायला हवे तिला राष्ट्रभाषेचा दर्जा असला तरी ती अधिकृत राष्ट्र भाषा म्हणून अस्तित्वात यायला हवी असे ते म्हणाले. सुरवातीला विध्यार्थ्यांनी हिंदीचा महिमा वर्णन करणारे गीत सादर केले. कु.गावडे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.









