बेळगाव :
केएसआर सीबीएसई स्कूल येथे हिंदी दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी स्वागत आणि भरतनाट्याम झाले. प्राचार्या डॉ. रत्ना बेंदीगेरी यांनी स्वागत केले. व्यवस्थापक चंद्रमती वेर्णेकर, समन्वयक सचिन आमटे यांनी प्रमुख पाहुण्या डॉ. कलावती निंबाळकर यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांनी हिंदी गाणी, कथा, दोहे सादर केले. हिंदी भाषेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ. कलावती यांनी हिंदी भाषेचे वैभव, उत्क्रांती व भविष्य याबद्दल माहिती दिली. शिक्षिका लतिफा मुल्ला व वर्षा गाडीव•र यांनी सूत्रसंचालन केले.









