राजस्थान येथील हिंदू व्यक्तीच्या निर्घृण खून प्रकरणाच्या विरोधात बेळगाव मधील भाजपसह विविध हिंदू संघटनांनी कित्तूर चन्नमा चौक येथे जोरदार निदर्शने केली. हत्या करणाऱ्या त्या नराधमांना फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
देशामध्ये हिंदूंना लक्ष बनविले जात आहे. जिहादी असलेल्या या तरुणांना दिसताचक्षणी गोळ्या घाला. अशी मागणी या संघटनांनी केली आहे.
यावेळी भाजपचे नेते किरण जाधव, धनंजय जाधव, हनुमंत कोंगाली, विश्व हिंदू परिषदेचे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









