अदानी समूहाने न्यूयॉर्कस्थित हिंडेनबर्ग या रिसर्च संस्थेने अदानी समुहावर अर्थिक नियमिततेचा आरोप केला. त्यावर कंपनाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आपल्या कंपन्यांवरील आरोप हे “भारतावरील हल्ला” असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या प्रतिक्रियेला हिंडनबर्ग संस्थेने जोरदार प्रत्युत्तर देऊन राष्ट्रवादाला पुढे करून लोकांची फसवणूक झाकली जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.
106 पानांच्या हिंडेनबर्ग संशोधनात ज्यामध्ये “स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणूक” असा आरोप करण्यात आला अहवालाला अदानी समुहाने 413 पानांनी प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये अदानी समूहाने, “हा केवळ कोणत्याही विशिष्ट कंपनीवर केलेला हल्ला नसून देशावर केलेला हल्ला आहे. यामुळे भारतीय उद्योग संस्थांचे स्वातंत्र्य, अखंडता आणि गुणवत्ता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
यावर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी यांच्या स्पष्टकरणाला “राष्ट्रवादाच्या आडून फसवणूकीला अस्पष्ट स्वरूप देण्याचा प्रयत्न” असल्याचे म्हटले आहे. पुढे हिंडनबर्गने अदानी समुहाचे चिनी नॅशनल (चांग चुंग-लिंग) बरोबर अनेक संबंध असूनही ते मान्यदेखील करण्याचा प्रयत्न केला नाही,” असा गंभीर आरोप केला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अदानी समूहाने आपल्या मूळ अहवालात गौतम अदानी यांचा मोठा भाऊ विनोद अदानी आणि चँग चुंग-लिंग यांच्यातील संबंधांवर स्पष्टीकरण दिले नाही.
ते म्हणतात “आम्ही हेसुद्धा दाखवले आहे की, Amicorp च्या मदतीने अनेक संशयित स्टॉक पार्किंग संस्था कशा तयार करण्यात आल्या. हि फसवणूक इतिहासातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. तसेच अलीकडील अदानी एंटरप्रायझेसमधील सार्वजनिक ऑफर (FPO) मध्ये मॉरिशसचे अनेक फंड आहेत. या फंडांनी सेबीच्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन केले असल्याचे आम्ही निदर्शनास आणले आहे.” असे निवेदनात आरोप करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









