विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर संभाजी चौगुले यांच्याकडून श्रीचरणी सेवा
प्रतिनिधी /बेळगाव
ग्रामीण भागात गणेश विसर्जनासाठी तलावांची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे नदी किंवा विहिरींमध्ये विसर्जन करावे लागते. हिंडलगा परिसरातील घरगुती आणि सार्वजनिक श्री गणेश मुर्तींचे विसर्जन मार्कंडेय नदीमध्ये केले जाते. याठिकाणी पाचव्या दिवशी आणि 11 व्या दिवशी विसर्जन करण्यास रात्री उशीरापर्यंत गर्दी होते. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी संभाजी चौगुले यानी दिव्यांची सुविधा उपलब्ध केली आहे.
आंबेवाडी तसेच हिंडलगा परिसरातही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन मार्कंडेय नदीपात्रात केले जाते. मात्र अंधारात विसर्जन करावे लागत असल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. ग्राम पंचायतकडून याठिकाणी कोणतीच सुविधा उपलब्ध केली जात नाही. त्यामुळे मार्कंडेय नदीच्या परिसरात प्रखर दिवे लावण्याचे काम संभाजी चौगुले यांनी केले आहे.
या परिसरात 8 हॅलोजन लावले आहेत. मागील 9 वर्षापासून हे कार्य त्यांनी सातत्याने सुरू ठेवले आहे. चौगुले हिंडलगा ग्रा.पं.मध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून कार्यरत आहेत.भाविकांच्या सुविधेसाठी आणि गणरायांच्या सेवेकरिता दिवे लावण्याची सेवा करीत आहेत. दिवे लावल्याने विसर्जनास येणाऱया भाविकांची चांगली सोय झाली आहे. तसेच दिव्यांमुळे अनर्थ टळण्याची शक्मयता आहे.









