वार्ताहर/हिंडलगा
येथील ग्राम पंचायतमार्फत बेळगाव-वेंगुर्ला रोडपासून येथील हायस्कूलपर्यंत सिमेंट काँक्रीटच्या रस्ताकामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ग्रा. पं. उपाध्यक्षा चेतना अगसगेकर, सदस्य रामचंद्र मनोळकर, रामचंद्र कुद्रेमणीकर, नागेश मनोळकर, कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन रमाकांत पावशे, कॉन्ट्रॅक्टर रमेश कडोलकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. प्रथम ग्रा.पं.तर्फे उपस्थितांचे स्वागत केले. सदस्य रामचंद्र मनोळकर, रामचंद्र कुद्रेमणीकर यांच्या हस्ते पूजन झाले. उपाध्यक्षा चेतन अगसगेकर यांच्या हस्ते कुदळ मारून रस्ताकामाचा शुभारंभ करण्यात आला. सदस्य नागेश मनोळकर यांनी श्रीफळ वाढविले. सदर रस्ता ग्रामपंचायत फंडातून मंजूर करण्यात आला आहे. याकरिता ग्रामपंचायत अध्यक्षा मीनाक्षी हित्तलमणी व पीडीओ स्मिता चंदरगी यांनी कामाला मंजुरी दिली आहे.









