नवी दिल्ली
हिंडाल्को इंडस्ट्रीज यांनी अलीकडेच इटलीमधील मेट्रा स्पा या कंपनीसोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. तंत्रज्ञानासंदर्भातील या भागीदारीच्या करारावरती उभय कंपन्यांच्या सह्याही झाल्या आहेत. हिंडाल्कोला रेल कोच बांधण्यासाठी मेट्रा स्पा ही कंपनी तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये सहकार्य करणार असल्याचेही सांगितले जात आहे. या नव्या भागीदारीअंतर्गत कंपनी दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचीही तयारी करत आहे.









