मुंबई
धातू क्षेत्रात कार्यरत हिंडाल्को कंपनीचा समभाग बुधवारी शेअरबाजारात घसरणीत असताना दिसला. कंपनीचा समभाग बुधवारी शेअरबाजारात 3.86 टक्के इतका घसरत 461 रुपयांवर खाली आला होता. सलग दुसऱया दिवशीदेखील समभाग घसरणीत राहिला असून गुंतवणूकदारांची चिंता वाढणे साहजिकच आहे. यापूर्वी या समभागाने 20 जून 2022 रोजी 309 रुपयांपर्यंत नीचांकी पातळी गाठली होती.









