मुंबई :
आदित्य बिर्ला समूहाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या हिंडाल्को इंडस्ट्रीजने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीमध्ये 2196 कोटी रुपयांचा एकत्रित नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या अवधीमध्ये 2205 कोटी रुपयांचा नफा मिळविला होता. याच अवधीमध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न 54,632 कोटी रुपयांवर घसरले आहे. मागच्या वर्षी याच अवधीत ते 56,504 कोटी रुपये होते. कंपनीच्या सर्व व्यवसायांनी तिमाहीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे.









