स्वत:च्या अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाणारी हिना खान ‘कंट्री ऑफ ब्लाइंड’ या चित्रपटातील व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांना चकित करणार आहे. इंग्रजी कादंबरीकार एचजी वेल्स यांच्या कहाणीवर आधारित चित्रपटात हिना खान मुख्य भूमिका साकारत आहे. याची कहाणी एका विशेष समुदायावर आधारित असून जो इतरांपासून वेगळा राहत असतो. एक विनाशकारी आजार या समुदायाला प्रभावित करतो, ज्यामुळे या समुदायाच्या नव्या पिढीची मुले दृष्टीक्षमतेशिवाय जन्माला येत असतात अशी याची कहाणी असणार आहे.
राहत शाह काजमी यांचे दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले असून यात इनामुलहक, प्रधुम्न सिंह मॉल, अनुष्का सेन, नमिता लाल, मीर सरवर, जितेंद्र राय, अहमद हैदर आणि हुसैन खान यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. कंट्री ऑफ ब्लाइंड चित्रपटात हिना खानसोबत शोएब निकाश शाह मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट वर्ल्डवाइडकडून केली जात आहे.
हिना खान ही छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोद्वारे तिने स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. हिना खान यापूर्वी ‘हॅक्ड’ या चित्रपटात देखील दिसून आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केले होते.









