वृत्तसंस्था/ कोवीलपट्टी (तामीळनाडू)
हॉकी इंडियाच्या येथे सुरू असलेल्या 12 व्या कनिष्ठ पुरूषांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत सातव्या दिवशी हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले. बिहार आणि अरूणाचल प्रदेश यांच्यातील सामना बरोबरीत राहिला.
अ गटातील झालेल्या पहिल्या सामन्यात हिमाचलप्रदेशने तेलंगणाचा 4-2 अशा गोल फरकाने पराभव केला. ब गटातील सामन्यात मध्यप्रदेशने बंगालवर 7-2 असा मोठा विजय मिळविला. इ गटातील बिहार व अरूणाचलप्रदेश यांच्यातील सामना 2-2 तसेच जम्मू-काश्मीर व आसाम यांच्यातील सामना 3-3 असा बरोबरीत राहिला. ड गटातील सामन्यात हरियाणाने मणिपूरचा 9-0 तर केरळने त्रिपुराचा 11-0 असा एकतर्फी पराभव केला.









