ऑनलाईन टीम/तरुण भारत
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचं (Himachal Pradesh election) बिगुल वाजलं आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. राज्यात एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबरमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यांनी यावेळी, राज्यात एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबरमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल अशी माहिती दिली. मतमोजणी व निकाल ८ डिसेंबर रोजी असेल. दरम्यान निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकांची घोषणा केलेली नाही.
हे ही वाचा : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल; दुसरा अर्ज कोणाचा? वाचा सविस्तर…
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले की, ६८ जागांच्या विधानसभा निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल. २५ ऑक्टोबर पर्यंत नामांकन दाखल केले जाऊ शकेल. २७ ऑक्टोबर रोजी प्राप्त उमेदवारी अर्जाची छाननी केली जाईल. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात. १२ नोव्हेंबर रोजी मतदान तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक –
अधिसूचना व अर्ज भरण्याची सुरुवात – १७ ऑक्टोबर २०२२
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २५ ऑक्टोबर २०२२
अर्जाची छाननी – २७ ऑक्टोबर २०२२
अर्ज मागे घेण्याची मुदत – २९ ऑक्टोबर २०२२
मतदान – १२ नोव्हेंबर २०२२
मतमोजणी/निकाल – ८ डिसेंबर २०२२









