नॅशनल हेराल्ड आमचे, भरपूर जाहिराती देऊ
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकार नॅशनल हेराल्ड वृत्तपत्रावर अधिक प्रमाणात कृपादृष्टी दाखवत असल्याचा आरोप होतोय. मागील दोन वर्षांमध्ये राज्य सरकारने काँग्रेस पक्षाच्या या वृत्तपत्राला 2.34 कोटी रुपयांच्या सरकारी जाहिराती दिल्या आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्या सोनिया गांधी आणि राहु ल गांधी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे. आरोपपत्रात 988 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर सुक्खू यांनी नॅशनल हेराल्ड आमचे वृत्तपत्र आहे आणि आम्ही याला भरपूर जाहिराती देऊ राहू असे वक्तव्य केले आहे. तर या वक्तव्यानंतर भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी टीका केली आहे. हिमाचलचे सुक्खू सरकारने आर्थिक संकट समोर असताना नॅशनल हेराल्डला कोट्यावधी रुपये दिले आहेत. हिमाचलमधील किती घरांमध्ये नॅशनल हेराल्ड पोहोचतो? राज्यात याची एकही प्रत येत नाही, तरीही राज्य सरकारकडून नॅशनल हेराल्डला कोट्यावधीच्या जाहिराती देण्यात आल्या आहेत. हिमाचल प्रदेशातून कोट्यावधी रुपये नॅशनल हेराल्डला मिळाले असून त्याची चौकशी देखील होणार असल्याचे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.









