चापगाव : चापगाव (ता. खानापूर) येथील जागृत देवस्थान श्री फोंडेश्वर मंदिर गेल्यावर्षी 1 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आले आहे. या मंदिरासमोर रात्रीच्यावेळी अंधार पडतो. मंदिरात येणाऱया भाविकांची गैरसोय होत होती. कौंदल येथील पुणेस्थित उद्योजक मारुती पाटील यांनी स्वखर्चाने जवळपास सव्वा दोन लाखाचे हायमास्ट पथदीप बसवून देण्याचे आश्वासन फोंडेश्वर मंदिर कमिटीला दिले आहे. शनिवारी मंदिरासमोरील आवारात उद्योजक मारुती पाटील यांनी पाहणी करून येत्या दोन महिन्यामध्ये आपण स्वखर्चाने हायमास्ट बसून देण्याची ग्वाही दिली. त्यांनी या मंदिर परिसरात सुशोभीकरण करण्यासाठी देऊ केलेल्या सहकार्याबद्दल देवस्थान कमिटीचे अध्यक्ष पिराजी कुऱहाडे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी ज्ये÷ नागरिक हभप रामा धबाले, ग्रा. पं. माजी अध्यक्ष रमेश धबाले, निंगाप्पा गोदी, पांडुरंग पाटील, अशोक बेळगावकर, पप्पू अंबाजी, नागो बेळगावकर, तोपिनकट्टी पंचायतचे उपाध्यक्ष लक्ष्मण तीरवीर, रवी पाटील, वकील आकाश अथणीकर तसेच विठ्ठल हलगेकरांचे सहकारी व पुजारी म्हात्रू गुरव व ज्ये÷ मंडळी उपस्थित होती.









