कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि वाहनांची ओळख पटवण्यासाठी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत एचएसआरपी बसवली नाही तर एक हजार रुपयांचा दंड होणार आहे. तरीही आजअखेर जिल्ह्यातील केवळ 768 वाहनधारकांकडून एचएसआरपी बसवण्यात आली आहे.
2019 पूर्वीच्या वाहनांना सुरक्षा क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट–एचएसआरपी) बसवणे बंधनकारक आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दहा लाख वाहनांना सुरक्षा क्रमांक पाटी लागणार आहे. असे असले तरी आतापर्यंत केवळ 768 वाहनांना ही पाटी बसवण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या नंबर प्लेटसाठी रोझमेट्टा सेफ्टी सिस्टिम लिमिटेडची नेमणूक केली असून, जिह्यात 29 अधिकृत फिटमेंट सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियम, 986 च्या नियम 50 नुसार वाहनांना एचएसआरपी बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. नंबर प्लेटमध्ये बसण्यासाठी वाहनांची ओळख पटविण्याचा त्यामागे उद्देश आहे. अधिकृत फिटमेंट सेंटर्सकडून वाहनांवर बनविण्यात आलेले एचएसआरपी हेच वैध मानले जाणार आहेत आणि वाहन वा अद्ययावत केले जाणार आहेत. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील एक एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या नोंदणीकृत वाहनांपैकी केवळ 768 वाहनधारकांनी एचएसआरपी बसविले आहे.
- एचआरएसपी बसवणाऱ्यांची संख्या वाढेल
जिल्ह्यात 2019 पूर्वीची सुमारे दहा लाख वाहने आहेत. या वाहनांना एचआरएसपी बसवावा लागणार आहे. एचएसआरपी बसवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फं आवाहन करण्यात आले आहे. सद्या प्रतिसाद कमी दिसत असला तरी काही दिवसात एचआरएसपी बसवणाऱ्यांची संख्या वाढेल.
संजीव भोर–प्रादेशिक परिवहन
- अधिकारीजिह्यातील अधिकृत फिटमेंट सेंटर्स
लकी व्हिल्स प्रायव्हेट लिमिटेड (जलाल पेट्रोल पंप, एनएच-04 हायवे, कणेरीवाडी), अॅरोन व्हिल्स,(शिवाजी उद्यमनगर), टेक्नोव्हिजन (टेंबे रोड, छत्रपती शाहू स्टेडियम), युनिक ऑटोमोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड युनिक झुंडाई (पुणे–बेंगलोर हायवे, शिरोली), आईन मोटर्स एलएलपी (आईन मोटर्स इसुक्षु, शिये फाटा), कोंडूसकर ऑटो सेंटर प्रायव्हेट लिमिटेड (प्लॉट नंबर 6, पुणे–बंगलोर हायवे, एमआयडीसी शिरोली), पार्श्व एंटरप्रायजेस (सी वॉर्ड, लक्ष्मीपुरी, दसरा चौक), मोटोस्काय,एलएलपी (शिवाजी उद्यमनगर), ट्रेंडी व्हिल्स प्रायव्हेट लिमिटेड (शिरोली एमआयडीसी), लकी ऑटो (अपोझिट कॉडूसकर पेट्रोलपंप, गोकुळ शिरगाव), महालक्ष्मी ट्रॅक्टर्स (शिरोली), प्रिशा ईव्ही (प्रिशा ईव्ही ग्राऊंड फ्लोअर, प्लॉट नंबर 07, दत्त को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी), भारत ऑटोमोटिव्ह (गेट नंबर. 108, पंजाब नॅशनल बैंक, बैंक ऑफ कॉमर्स, शिरोली),व्हेनेटियन व्हिल्स (महालक्ष्मी हॉल, कावळा नाका), व्हीकेपीएच मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड (रेणू प्रेस्टिज बिल्डिंग, शिवाजी उद्यमनगर), युनिक ऑटोमोबाईल (पुणे–बेंगलोर हायवे, शिरोली), मोहन ऑटो इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड (517-ई, पुणे–बेंगलोर हायवे), केआर मोटार (वाय. पी. पोवार नगर चौक, शिवाजी उद्यमनगर), युनिक ऑटोमोबाईल्स (निम शिरगाव, हौसाबाई मगदूम कॉलेज), काले बजार कॉलेज, इचलकरंजी) अघी एंटरप्रायजेस (पो संकेश्वर रोड, गडहिंग्लज रोड, इचलकरंजी), कारो (संकेश्वर ऑटोमोबाईल्स (इकार चंदगड), शिवतेव मोटर्स फाटा, जयसिंगपुर शिरोळ अँग्रोटेक (स्वराज ट्रैक्टर्स, रोड, मुदाळ विल), एस अॅन्ड कंपनी (महात्मा पुरे मिल, मौजे बाठार त लकी ऑटो (दत्त मंदिर, ससे गडहिंग्लज), लॉजिस्टिक लिमिटेड, युनाती मेट पेट्रोल पंप
- वाहन प्रकार व शुल्क (रुपयांत)
दुचाकी 450
तीनचाकी-500
इतर वाहने 750
- यासाठी एचएसआरपीची आवश्यकता
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड रोखणे
बनावटगिरी करून होणारे गुन्हे रोखणे
रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे








