Rahul Gandhi : मोदी आडनाव मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आव्हान याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने आज नकार देत निकाल राखून ठेवला. न्यायमूर्ती हेमंत प्रचारक यांनी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवू, असे स्पष्ट केले.
सुरत न्यायालयाने राहुल गांधींना मोदी आडनाव प्रकरणी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना संसदेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले. न्यायमूर्ती हेमंत एम. प्रचारक यांच्या खंडपीठासमोर तक्रारदार पूर्णेश मोदी यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील निरुपम नानावटी यांनी हजेरी लावली. गुन्ह्यांचे गांभीर्य, शिक्षा या पातळीवर पाहिले जाऊ नये, असे ते म्हणाले. त्यांची (राहुल गांधी) अपात्रता कायद्यानुसार झाली आहे. दरम्यान, न्यायमूर्तींनी खटल्यातील मूळ रेकॉर्ड आणि कार्यवाही आपल्यासमोर ठेवण्याचे आदेश ट्रायल कोर्टाला दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









