Gokul Milk News : गोकुळ दूध संघाचे चाचणी लेखापरीक्षण थांबवण्यास उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. याबाबतच्या पुढील सुनावणीसाठी कोर्टाने ८ जून ही तारीख दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयाने गोकुळमध्ये सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.
कोर्टाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने याबाबतच्या सुनावणीसाठी १ महिन्यानंतरची तारीख कोर्टाकडून देण्यात आली असून, तोपर्यंत पुढील कारवाई संदर्भात निर्देश देऊ नयेत अश्या सूचना शासनास दिलेल्या आहेत. दरम्यान, गोकुळच्या चाचणी लेखापरीक्षण अहवालाचे कामकाज सुरू ठेऊन शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गोकुळमधील सत्ताधारी गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नेमकं काय घडलं
गोकुळच्या संचालिका सौ.शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनुसार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. सदरचे लेखापरीक्षण थांबवावे, तसेच चौकशी करू नये यासाठी गोकुळ दूध संघाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.गोकुळ दूध संघाचे चाचणी लेखापरीक्षण थांबवण्यास उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. तसेच याबाबतच्या पुढील सुनावणीसाठी ८ जून ही तारीख कोर्टाने दिली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









