प्रतिनिधी,कोल्हापूर
गुंतवणूकीवर दामदुप्पट परतावा देण्याच्या अमिषाने गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ए.एस. ट्रेडर्सच्या 29 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आठ संशयीतांनी अटकपुर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. गुन्हा दाखल झालेल्या ए. एस. ट्रेडर्सच्या 29 संचालकांनी कोल्हापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी द्यावी. त्यांनी पोलीसांना तपासात सहकार्य करावे, साक्षीदारांवर दबाव टाकू नये असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.
गुंतवणूकदरांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून ए. एस. ट्रेडर्स व त्याच्या सहकारी इतर कंपण्यांनी कोल्हापूरसह शेजारच्या जिह्यातील गुंतवणूकदारांना कोटयवधी रुपयांचा गंडा घातला. सहा महिन्यांपासून परतावा बंद झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. फसवणूक झाल्याबद्दल या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हयाची व्याप्ती लक्षात आल्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग केला आहे. गुन्हा दाखल असलेल्या 29 संचालकांपैकी केवळ एकच संचालक अटक असून तोही जामीनावर सुटलेला आहे.
यातील आठ संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. यावर मंगळवारी सुनावणी झाली. न्यायालयाने आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या तपास अधिकाऱ्यांचे म्हणणेही ऐकून घेतले.दोन्ही बाजूच्या वकीलांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने ए. एस. ट्रेडर्सच्या सर्वच संचालकांना पुढील 10 दिवस कोल्हापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. पोलीसांना तपासात सहकार्य करावे, यापुढे कोणत्याही प्रकारची ऑनलाईन मिटींग घेऊ नये, साक्षीदारांवर दबाव टाकू नये अशाही सुचना केल्या आहेत. मात्र संशयीतांच्या अटकपूर्व जामीन अर्जाबाबत न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नाही. यावेळी गुंतवणूकदार कृती समितीचे पदाधिकारी हजेरी होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









