राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी नागपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत कडू यांच्या विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय डीनपदी केली होती. या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या माजी सिनेट सदस्य मोहन बाजपेयी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि इतरांना नोटीस बजावली आहे.
मागील वर्षी 11 नोव्हेंबरला विद्यापीठातील डीन निवडीच्या मुलाखती होणार होत्या. मुलाखत होण्याच्या काही दिवस आधी विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांनी त्यांच्या मर्जीतील एका उमेदवाराची नियुक्ती केल्याचा आरोप मोहन बाजपेयी यांनी केला. डीनच्या निवडीत पक्षपातीपणा झाल्याचा आरोप करून बाजपेयी यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती.
राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, मोहन बाजपेयींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेवून त्यांनी ही नियुक्ती “बेकायदेशीर आणि वादग्रस्त” असल्याचे म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने कुलगुरू सुभाष चौधरी यांच्याशिवाय विद्यापीठाचे कुलसचिव राजू हिवासे, प्राचार्य प्रशांत कडू तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








