जोधपूर :
लैंगिक शोषणाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंना राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने त्यांचा अतंरिम जामीन वाढविण्यास नकार दिला आहे. आसाराम यांना आता 30 ऑगस्टपर्यंत जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आत्मसमर्पण करावे लागणार आहे. वैद्यकीय अहवालानुसार आसाराम यांची प्रकृती तुरुंगात राहण्याजोगी असल्याचे राजस्थान उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.









