अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले स्वागत
बेळगाव : रवांडाच्या हायकमिशनर जॅक्वेलिन मुकनजिरा व राजदूत मोहन सुरेश यांच्या नेतृत्वाखालील पूर्व आफ्रिकेतील अधिकाऱ्यांच्या एका पथकाने हुदली येथील बेळगाव शुगर्स प्रा. लि. साखर कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सतीश जारकीहोळी, यरगट्टी शुगर्स व सतीश शुगर्सचे संचालक राहुल जारकीहोळी, चेअरमन व सीएफओ प्रदीपकुमार इंडी, उपाध्यक्ष एल. आर. कारगी, आर्थिक विभागाचे डी. आर. पवार, तांत्रिक विभागाचे व्ही. एम. तळवार, ए. एस. राणा आदी यावेळी उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने कारखान्याच्या वेगवेगळ्या विभागांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. कारखान्याने उपलब्ध केलेल्या पायाभूत सुविधा, उत्तम वातावरण, ग्रामीण भागातील शेतकरी, युवक व लहान मुलांच्या कल्याणासाठी, शिक्षणासाठी केलेल्या कामांची माहिती घेतली. हायकमिशनर जॅक्वेलिन यांनी येथील कामकाज पाहून आनंद व्यक्त केला. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शिष्टमंडळाचे स्वागत करून रवांडा व बेळगाव यांच्यात व्यवसाय वृद्धीसाठी व आंतरराष्ट्रीय व्यापार उद्योगासाठी ही भेट महत्त्वाची ठरणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.









