60 लाखांत एक स्वच्छतगृह, सर्व सुविधांचा असणार समावेश
कोल्हापूर विनोद सावंत
शहरामध्ये आता हायक्लास (अतिउच्च दर्जाचे) स्वच्छतागृह उभारली जाणार आहेत. सात ठिकाणांची यासाठी निवड केली आहे. राज्यशासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘आकांक्षी’ स्वच्छतगृह अशी याची संकल्पना आहे. यासाठी 4 कोटी 37 हजार खर्च अपेक्षित आहे. राज्यशासनाकडून या निधीसाठी ग्रीन सिंग्नल मिळाल्यानंतर याचे प्रत्यक्ष कामकाज सुरू आहे.
शहरामध्ये सार्वजानिक स्वच्छतागृहांची स्थिती दयनयी आहे. रोज हजारो पर्यटक कोल्हापुरात येतात. जिल्ह्यातूनही नागरीक मोठ्या संख्येने शहरात कामानिमित्त येतात. मात्र, पुरेसे सार्वजाणिक स्वच्छतगृह नसल्याने त्यांची गैरसोय होते. विशेष करून महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्dयाऐवढीच आहे. विविध सामाजिक संस्था, पक्षांनी महापालिकेकडे महिलांसांठी चांगल्या दर्जाची स्वच्छतगृह उभारण्याची मागणी जोर धरत आहे. महिला आयोगाकडेही यासंदर्भात तक्रारी गेल्या आहेत. यामुळे महापालिकेने आता अकांक्षी स्वच्छतगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यशासनाने स्वच्छ भारत अभियान 2.0 मधून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये आकांक्षी स्वच्छतागृह उभारत आहे. ही स्वच्छतागृह अतिउच्च दर्जाची असणार आहेत. या स्वच्छतगृहासाठी राज्यशासनाने प्रति सिटसाठी अडीच लाखांचे अनुदान दिले आहे. याबाबतच्या सूचना संबंधित महापालिकेना दिल्या आहेत. कोल्हापूर महापालिकेस 10 आकांक्षी स्वच्छतागृह मंजूर आहेत. यापैकी महापालिका पहिल्या टप्प्यात सांस्कृतिक महत्व असणाऱ्या तसेच पर्यटकांची नेहमी गर्दी असणाऱ्या 7 ठिकाणी आकांक्षी स्वच्छतागृह उभारणार आहेत. एका स्वच्छतागृहाचा खर्च सुमारे 60 लाख आहे. 72 सीट असणार आहेत. यासाठीचा प्रस्तावही तयार केला आहे. यामध्ये मनपाच्या हिस्स्याच्या रक्कमेची तरतूदही मनपाने करून ठेवली आहे.
मोफत नव्हे, चार्ज आकरणी
कोणतीही गोष्ट मोफत असल्यास त्याची किम्मत नसते. त्याचा वापर कसाही केला जातो. सार्वजाणिक स्वच्छतागृहाची हीच अवस्था असते. त्यामुळे नव्याने होणाऱ्या 7 आकांक्षी स्वच्छतागृहाची जबाबदारी खासगी यंत्रणेमार्फत चालविले जाणार आहे. स्वच्छतागृहांच्या मेंटनन्स होण्यासाठी नाममात्र चार्ज आकारणी केली जाणार आहे.
आकांक्षी शौचालयाची वैशिष्टे
मार्बल-ग्रेनाईटसह इतर साहित्य अतिउच्च दर्जाचे वापरणार
पुरूष, महिला, दिव्यांग, लहान मुले, तृतीयपंथींसाठी स्वतंत्र सुविधा
हिरकणी कक्ष, स्नानगृह
हँडड्रायर, पेपर नॅपकिनची सोय
महिला स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन वेडींग मशिन
अडीच लाखांचा केवळ एक सिट असणार
फुलटाईम केअरटेकर नियुक्त केला जाणार
पाच वर्ष ठेकेदार मेंटनन्स करणार
ठिकाण सीट अंदाजीत खर्च
खराडे कॉलेज परिसर 10 59 लाख 49 हजार
ताराबाई चौक परिसर 10 58 लाख 60 हजार
दसरा चौक 10 56 लाख 61 हजार
राजाराम गार्डन 10 59 लाख 20 हजार
हुतात्मा पार्क 14 64 लाख 61 हजार
बिंदू चौक पार्कींग 8 45 लाख 59 हजार
पंचगंगा घाट 10 56 लाख 23 हजार
एकूण 72 4 कोटी 37 हजार
तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव
शहरात सात ठिकाणी अकांक्षी स्वच्छतगृह उभारण्यासाठीचा तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव मनपाच्या प्रकल्प विभागाकडून महाराष्ट्र जीवनप्राधिकरणाकडे दिला जाणार आहे. त्यांच्याकडून राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार असून अंतिम मंजूरी मिळाल्यानंतर निधी मनपाकडे वर्ग झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.
डॉ. विजय पाटील, सहायक आयुक्त, महापालिका









