वृत्तसंस्था/ प्राग्वे
झेक प्रजासत्ताकमध्ये झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या टेनिस स्पर्धेत जपानच्या नाओ हिबिनोने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. तिने अंतिम सामन्यात झेकच्या नोसकोव्हाचा पराभव केला. डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील हिबिनोचे हे तिसरे विजेतेपद आहे. तिने यापूर्वी म्हणजे 2015 साली ताश्कंदमध्ये तर 2019 साली हिरोशिमा टेनिस स्पर्धेत विजेतीपदे मिळविली होती. या स्पर्धेतील रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात हिबिनोने नोसकोव्हाचा 6-4, 6-1 असा पराभव केला. या स्पर्धेत वारंवार पावसाळी वातावरणामुळे अनेक सामने लांबणीवर टाकण्यात आले होते.









