हायफा शहरावर 90 रॉकेट्सने हल्ला : आयडीएफकडून संरक्षणात्मक कारवाई
वृत्तसंस्था/ हायफा
दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने इस्रायलवर 165 हून अधिक रॉकेट्स डागत हल्ला केला आहे. या हल्ल्यात इस्रायललच्या बिइना शहरात एका मुलासमवेत 7 जण जखमी झाले ओत. याचबरोबर हिजबुल्लाहने गॅलिली शहराला लक्ष्य केले असून त्याच्या दिशेने 55 रॉकेट्स डागण्यात आली होती.
हिजबुल्लाहने हायफा शहराच्या दिशेने 90 रॉकेट्स डागली, इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेसनुसार (आयडीएफ) हिजबुल्लाहने पहिल्यांदा हायफावर 90 रॉकेट्स डागील होती. यातील बहुतांश रॉकेट्स आकाशात नष्ट करण्यात आली. तर दुसऱ्या वेळेला 10 रॉकेट्स डागण्यात आली. हायफावर हल्ला झाल्याच्या काही तासांनी आयडीएफने हिजबुल्लाहच्या रॉकेट लॉँचर्सनाच नष्ट केले आहे.
तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी काही दिवसांपूर्वी सप्टेंबर महिन्यात झालेल्या पेजर स्फोटांप्रकरणी जबाबदारी स्वीकारली होती. या स्फोटांमुळे हिजबुल्लाहचे शेकडो सदस्य गंभीर जखमी झाले होते. तर दोन जणांना जीव गमवावा लागला होता.









