वृत्तसंस्था/ लेबनॉन
इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या मजरात गेमजेम भागात हिजबुल्लाहच्या एका वरिष्ठ कमांडरला ठार मारले आहे. हिजबुल्लाहच्या शाकीफ प्रदेशात शनिवारी हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तेथे हिजबुल्लाहचे दहशतवादी नेटवर्क पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आल्याचे इस्रायली सैन्याने सांगितले. दक्षिण लेबनॉनमध्ये दहशतवाद पुन्हा उदयास येण्यापासून रोखणे हा या हल्ल्यामागील उद्देश असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. इस्रायली सैन्यासाठी हे आणखी एक महत्त्वाचे यश मानले जात आहे. मात्र, या घटनेमुळे सीमेवर हिंसाचार वाढू शकतो आणि इस्रायल-लेबनॉन संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वाढू शकते.









