नवीन खांब बसविल्याने नागरिकात समाधान
बेळगाव : राणी चन्नम्मानगर येथील कोसळण्याच्या स्थितीत असलेला विद्युत खांब हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने बाजूला काढून, त्या ठिकाणी नवा खांब बसविला. यामुळे चन्नम्मानगर नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून असे धोकादायक खांब कोठेही असल्यास हेस्कॉमशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चन्नम्मानगर येथे मंगळवार दि. 23 रोजी एक विद्युत खांब कलंडला होता. केवळ विद्युत वाहिन्यांमुळे खांब टेकून होता. एका बाजूला रस्ता व दुसऱ्या बाजूला घर असल्याने धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी याची तक्रार हेस्कॉमकडे करताच साहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करुर व सेक्शन ऑफिसर व्यंकटेश कळ्ळीमनी यांनी याची दखल घेऊन जुना विद्युत खांब बाजूला काढून त्या ठिकाणी नवा विद्युत खांब बसविला आहे.









