बेळगाव प्रतिनिधी– शहराच्या मध्यवर्ती भागात येणार्या हेस्कॉम उपविभाग 1 ला सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांची प्रतिक्षा आहे. तीन महिने उलटले तरी अद्याप इतर कोणालाहि नियुक्ती देण्यात आली नसल्याने यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हेस्कॉमच्या या सावळय़ा गोंधळाचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे. हेस्कॉमचे तत्कालीन सहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद गदगकर यांची कंत्राटदारांनी केलेल्या तक्रारीमुळे बदली करण्यात आली. त्यांच्या जागी एका अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली खरी परंतु त्यांनी पंधरा दिवसातच इतरत्र बदली स्विकारली. शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक शोरूम, कार्पोरेट ऑफिस, दुकान, यासह हॉस्पिटल यांचा समावेश आहे. या सर्व भागात सुरळीत विजपुरवठा ठेवणे गरजेचे असल्याने सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांची गरज हि भासतेच. असे असताना हेस्कॉमकडून मात्र नियुक्तीसाठी चाल ढकल होत आहे.
तात्पूरता पदभार शहर उपविभाग 2 चे सहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करूर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शहापूर, वडगाव, अनगोळ व औद्योगिक वसाहत असणारा उद्यमबाग हा सर्वच भाग त्यांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे या सर्व भागासह त्यांना आता शहराचाहि कारभार पहावा लागत आहे. सर्व्हर डाऊनमुळे वैतागलेल्या नागरिकांना अधिकारी नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याची तक्रार हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकार्यांना करून देखील त्यांच्याकडून कोणतीच हालचाल अद्याप करण्यात आलेली नाहि.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन