केएलई इंटरनॅशनल उपविजेता, लक्ष खातायत मालिकावीर सोहन पुजारी सामनावीर
बेळगाव : द बेळगाव क्रिकेट क्लब आयोजित सराफ शिल्ड 15 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एम. व्ही. हेरवाडकर संघाने केएलई इंटरनॅशनल संघाचा 52 धावांनी पराभव करून सराफ शिल्ड पटकाविला. लक्ष खातायत त्याला मालिकावीर तर सोहन पुजारी ला सामनावीरांनी गौरविण्यात आले. एसकेई प्लॅटिनम जुबली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात आठ गडी बाद 117 धावा केल्या. त्यात सोहम पुजारीने दोन षटकार, चार चौकारांसह 31 धावा, लक्ष खातायत पाच चौकारासह 27, सुजल इटगीने 16 तर मंथनने 10 धावा केल्या. केएलईतर्फे कलश बेनकटी व कौस्तुभ पाटील यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तर दाखल खेळताना केएलई इंटरनॅशनल संघाचा डाव 15 षटकात 65 धावात आटोपला.
त्यात कौस्तुभ पाटीलने तीन चौकारासह 21 तर स्वयंम खोत दोन चौकाराचा दहा धावा केल्या. एम. व्ही. हेरवाडकरतर्फे गोलंदाजी करताना लक्ष खतायत व सिद्धांत यांनी प्रत्येकी दोन तर सुजल इटगीने एक गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते विजय सराफ, अभय सराफ, अथर्व सराफ, आनंद सराफ व हेरवाडकर स्कूलच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी, स्पर्धा सचिव विवेक पाटील, बाळकृष्ण पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या एम. व्ही. हेरवाडकर व उपविजेत्या केएलई संघाला आकर्षक ढाल, चषक, प्रमाणपत्र व पदके देऊन गौरवण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर सोहम पुजारी हेरवाडकर, उत्कृष्ट फलंदाज कौस्तुभ पाटील केएलई, उत्कृष्ट गोलंदाज सिद्धार्थ मेणसे हेरवाडकर व मालिकावीर लक्ष खतायत हेरवाडकर यांना चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रसाद नाकाडी व आनंद खोरागडे यांनी विशेष परिश्रम घेतले.









