दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांद्वारे हल्ल्याची क्षमता : दोन्ही सीमांवर देखेरख ठेवणार
वृत्तसंस्था/ लेह
भारताने उत्तर सेक्टरच्या सीमावर्ती क्षेत्रातील वायुतळावर अत्याधुनिक हेरोन मार्क-2 ड्रोन तैनात केले आहेत. हे ड्रोन्स दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांद्वारे शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. याच्या एकाच उड्डाणात चीन तसेच पाकिस्तान या दोन्ही देशांना लागून असलेल्या सीमांवर देखरेख ठेवता येणार आहे.
हेरोन मार्क-2 ड्रोन इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजकडून निर्माण करण्यात आला आहे. याच्या एकाच उ•ाणात अनेक मोहिमांना मूर्त रुप दिले जाऊ शकते. तसेच एकाचवेळी अनेक क्षेत्रांमध्ये नजर ठेवली जाऊ शकते.
तर भारतीय वायुदलाने शनिवारीच श्रीनगर वायुतळावर अत्याधुनिक मिग-29 लढाऊ विमानांची स्क्वाड्रन तैनात केली होती. उत्तर सेक्टरमध्ये मिग-29 आणि हेरोन मार्क-2 ड्रोन तैनात झाल्याने सैन्याचे बळ वाढणार आहे.

24 तास टेहळणी करण्याची क्षमता
हेरोन मार्क-2 हा अत्यंत सक्षम ड्रोन आहे. हा ड्रोन दीर्घकाळापर्यंत उड्डाण करण्यास सक्षम असून मोठ्या भूभागावर टेहळणी करू शकतो. मॉडर्न एवियोनिक्स अणि इंजिनमुळे ड्रोनचा मोहिमात्मक कालावधी वाढला आहे. हा ड्रोन उपग्रहीय संपर्कव्यवस्थेने युक्त असून लक्ष्यावर 24 तास नजर ठेवून राहण्यास सक्षम असल्याची माहिती ड्रोन स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर विंग कमांडर पंकज राणा यांनी दिली आहे. हेरोन मार्क-2 ड्रोन लढाऊ विमानांनाही मोहिमेत मदत करू शकतात. हे ड्रोन स्वत:च्या लक्ष्यावर लेझर लाइट पाडतात, ज्यामुळे लढाऊ विमानांना लक्ष्याची ओळख पटवून त्यावर अचूक निशाणा साधण्यास मदत होते.
शून्यापेक्षा कमी तापमानातही प्रभावी
हेरोन मार्क-2 हा जुन्या व्हर्जनपेक्षा अत्यंत प्रभावी आहे. हा ड्रोन कमी तापमानाही काम करण्यास सक्षम आहे. भारतीय वायुदल सध्या चीता प्रोजेक्टवर काम करत आहे. याच्या अंतर्गत 70 हेरोन ड्रोन्सना अपग्रेड केले जाणार आहे. यात सॅटेलाइट कम्युनिकेशन लिंक आणि गरजेनुसार शस्त्रास्त्रs जोडली जाणार आहेत. सैन्याला लवकरच अमेरिकेकडून 31 प्रिडेटर ड्रोन्स देखील मिळणार आहेत. या ड्रोन्समध्ये देखील शस्त्रास्त्रs आणि अनेक प्रकारचे सेंसर्स लावले जाणार आहेत. यातील 15 ड्रोन नौदलाला तर प्रत्येकी 8 ड्रोन वायुदल अन् सैन्याला प्राप्त होणार आहेत.
श्रीनगरमध्ये मिग-29 तैनात
भारतीय वायुदलाने 12 ऑगस्ट रोजी श्रीनगरच्या वायुतळावर मिग-29 लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रनला तैनात केले आहे. या विमानांनी मिग-21 ची जागा घेतली आहे. मिग-29 विमानांना अपग्रेड करण्यात आले असून त्यात अनेक अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. या विमानांवर दीर्घ पल्ल्याची हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रs, नाइट व्हिजन, एअर-टू-एअर रिफ्यूलिंग समवेत अनेक नवी वैशिष्ट्यो जोडण्यात आली आहेत.









