वृत्तसंस्था/इंफाळ
मणिपूर पोलिसांनी 10.565 किलो हेरॉइन पावडर जप्त करत नुकतीच मोठी कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. इंफाळ-दिमापूर या राष्ट्रीय महामार्ग-2 वर ही कारवाई करण्यात आली असून एका जोडप्यासह तीन ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली. अमली पदार्थांच्या तस्करीबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर इंफाळ पश्चिम पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली सेकमाई पोलिसांनी सेकमाई पोलीस स्टेशन हद्दीत शोधमोहीम राबवली. यादरम्यान वाहनांची तपासणी करत हेरॉइन जप्त करण्यात आले. एका बोलेरोमध्ये हेरॉइन सापडले असून सदर चालक सेनापती जिह्यातील मैबा गावातील रहिवासी आहे. संबंधिताचे नाव के. पी. जेकब असे असून त्याने अमली पदार्थ तस्करीची कबुली दिली आहे.









