वृत्तसंस्था / ऐझवाल
मिझोराममध्ये राज्याच्या उत्पादनशुल्क आणि अंमली पदार्थ विभागाने टाकलेल्या धाडीत 90 लाख रुपयांचे 3.64 किलो हेरॉईन जप्त केले आहे. गेल्या गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईची माहिती मंगळवारी देण्यात आली आहे. हा या राज्यातील या वर्षीचा जप्त केलेला सर्वात मोठा साठा आहे. या प्रकरणी 3 लोकांना अटक करण्यात आली असून त्यातील फैझूर रेहमान हा आसामचा आहे. या हेरॉईनच्या वाहतुकीसाठी उपयोगात आणला गेलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे. बांगलादेशी तस्करांकडून या भागात म्यानमारच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. नंतर भारतात अन्यत्र ते पाठविले जातात. या प्रकरणात आणखी चौकशी सुरु असून मोठे रॅकेट उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.









