तरनतारन
भारत-पाकिस्तान सीमेवर मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा पाकिस्तानी ड्रोनने घुसखोरी केली होती. ड्रोनचा आवाज ऐकून सतर्क झालेल्या बीएसएफ जवानांच्या कारवाईमुळे ड्रोन पाकिस्तानात परतला होता, परंतु ड्रोनकडून फेकण्यात आलेले 17 कोटी रुपयांचे हेरॉइन जवानांनी जप्त केले आहे. तरनतारन येथील कलसियां खुर्द गावात हेरॉइनची खेप सापडली आहे. बीएसएफच्या जवानांना शोधमोहिमेच्या दरम्यान हे अमली पदार्थ हस्तगत झाले आहेत.









