प्रतिनिधी/ बेळगाव
हेरॉईनची विक्री करणाऱ्या एकाला सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे. सोमवार दि. 18 रोजी तांगडी गल्ली, रेल्वे ट्रॅकनजीक ही कारवाई करण्यात आली असून कैफ राजेसाब मुजावर (वय 21) रा. शिवाजीनगर असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 19 हजार रुपये किमतीचे 21.63 ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी खडेबाजार पोलीस स्थानकात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडेबाजार पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या तांगडी गल्ली येथील रेल्वे ट्रॅकनजीक थांबून एकजण हेरॉईनची विक्री करत आहे, अशी माहिती सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदेश्वर पुंभार यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व सहकाऱ्यांनी सदर ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली.









