मडगांव : दुचाकी उत्पादक हिरो मोटोकॉर्प ने स्वस्त किमतीत शक्तिशाली इंजिन असलेली नवीन स्कूटर ‘हिरो झूम’ लाँच केली आहे. मडगावात अनुशरण मोटर्स शोरूम मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी ‘हिरो झूम’चे अनावरण केले. यावेळी अनुशरण मोटर्सचे संजय वेर्लेकर उपस्थित होते. कंपनीच्या या नवीन स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 68,599 ऊपयांपासून सुरू होते. टॉप मोडेलची किंमत 1 लाख रूपयांच्या घरात आहे. भारतीय बाजारपेठेत तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ते प्रकार म्हणेज शीट ड्रम, कास्ट ड्रम आणि कास्ट डिस्क होय. हिरो झूम 5 वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध केली आहे. पोलेस्टार ब्लू, ब्लॅक, स्पोर्ट्स रेड आणि मॅट, अब्राक्स ऑरेंज या पाच रंगांमध्ये सादर केली आहे. डिझाईनच्या बाबतीत कंपनीने सांगितले की, हिरो झूम अशा ग्राहकांसाठी तयार केले आहे जे त्यांच्या नेहमीच्या प्रवासाच्या अनुभवापेक्षा वेगळे आहे. सध्याच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हिरो झूम स्कूटर नवीन डिझाइनसह सादर केली आहे. बाजारपेठेतील नवीनतम डिझाइन असलेली ही झूम स्कूटर ग्राहकांना चांगली गतिशीलता आणि कार्यप्रदर्शन प्रदान करण्यास सक्षम असेल. आज युवा पिढीची क्रेझ ओळखून हिरो मोटोकॉर्पने हिरो झुम ही स्कुटर बाजारपेठेत आणली असून तिला चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वास आमदार दिगंबर कामत यांनी व्यक्त केला.
झूममध्ये शक्तिशाली इंजिनसह अनेक वैशिष्ट्यो
हिरोच्या नवीन स्कूटर झूममध्ये शक्तिशाली ँए-न्न्घ् आधारित इंजिन देण्यात आले आहे. जे हिरो मोटोकॉप च्या ग्3ए तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह नवीनतम डिजिटल स्पीडोमीटर मिळतो. झूम स्कूटरला साइड-स्टँड इंजिन कट ऑफ फीचर देण्यात आले आहे. हे वैशिष्ट्या स्कूटरचे तांत्रिक प्रोफाइल आणखी वाढवते. पद Xददस् हे 110म्म् इंजिन विभागातील एक नवीन उत्पादन आहे. हिरो इंटेलिजेंट कॉर्नरिंग लाइट, मोठा आकार आणि ऊंद टायर ही या नवीन स्कूटरमधील वैशिष्ट्यो आहेत.









