नवी दिल्ली : दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिरोमोटो कॉर्पला मोठा धक्का सहन करावा लागला आहे. कंपनीमधील 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांनी मागच्या महिन्यामध्ये 5 हजार कर्मचाऱ्यांना संबोधित केले होते. त्यामध्ये चेअरमन मुंजाल यांनी मी तुम्हा सर्वांवर बारीक नजर ठेऊन असल्याचे वक्तव्य केले होते. या त्यांच्या व्यक्तव्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये कांहीसा गोंधळाचा कल दिसून आला. यानंतर कंपनीतले वातावरण बदलले असून कंपनीतील 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये मुख्य माहिती आणि डिजिटल विभागाच्या मुख्य अधिकारी रिमा जैन, एचआर हेड टॅलेंट मॅनेंजमेटचे समीर पांडे, इमर्जिंग मोबिलिटी विदाचे सीबीओ स्वदेश श्रीवास्तव, एचआर हेड आणि कल्चर चेंजचे अधिकारी धर्मरक्षित यांचा समावेश आहे.
सीईआंsचा आधी राजीनामा
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात हिरो मोटोकॉर्पचे सीईओ निरंजन गुप्ता आणि मुख्य व्यवसाय अधिकारी रंजीव जीत सिंह यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार यानंतर राजीनामा दिलेले अधिकारी हे गुप्ता आणि सिंह यांनी कंपनीत आणलेले आहेत. ज्यांनी आपल्याला कंपनीत आणलं ते सोडून गेले तर आपण का राहायचं या भूमिकेतून वरील चौघांनी पाठोपाठ राजीनामा दिला आहे.
कामगिरी खालावली
बाजारात पक्कड कमकुवत झालेली पाहून कंपनी अधिक सजग झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या दहा वर्षांत कंपनीला खराब कामगिरीचा सामना करावा लागत आहे. मागच्या महिन्यामध्ये हिरो कंपनीला मागे टाकत होंडा मोटारसायकल अॅण्ड स्कूटर इंडिया ही देशातील नंबर एकची दुचाकी निर्माती कंपनी बनली होती. हिरोच्या जानेवारी महिन्यामध्ये वाहन वितरणात 17 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.









