मुंबई
कंपनीच्या हार्ले डेव्हीडसन एक्स 440 या दुचाकीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा परिणाम हिरो मोटोकॉर्पच्या समभागावर शेअरबाजारात सकारात्मक पाहायला मिळाला. सदरचा हिरो मोटोकॉर्पचा समभाग बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 4 टक्के वाढत 3066 रुपयांवर पोहचला होता. 4 जुलैला हार्ले डेव्हीडसनच्या बुकिंगला सुरुवात झाली होती, तेव्हापासून सदरच्या नव्या दुचाकीसाठी 25 हजार जणांनी बुकिंग केल्याचे समजते. या कॅलेंडर वर्षात समभाग जवळपास 13 टक्के वधारला आहे.









