नवी दिल्ली :
दुचाकी निर्मिती क्षेत्रातील कंपनी हिरो मोटोकॉर्प यांनी जानेवारी महिन्यातील दुचाकी विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये 4 लाख 33 हजार 598 दुचाकींची विक्री कंपनीने केली आहे. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये 3 लाख 56 हजार 690 दुचाकींची विक्री कंपनीने केली होती. कंपनीचा समभाग गेल्या पाच दिवसांमध्ये 5 टक्के वाढले आहेत तर गेल्या सहा महिन्यांमध्ये समभागाने 57 टक्के इतका परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. एका वर्षामध्ये पाहता हा समभाग 77 टक्के वाढला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गेल्या 30 दिवसांमध्ये निफ्टी ऑटो निर्देशांक 5.4 टक्के इतका वाढला आहे.









