नवी दिल्ली: दुचाकी वाहन उद्योगातील कंपनी हिरॉमोटो कॉर्पने आपला चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतला नफा जाहीर केला असून नफ्यामध्ये 19 टक्के वाढ दर्शवली आहे. सदरच्या कालावधीत कंपनीचा नफा 30 जूनला संपलेल्या तिमाहीमध्ये 700 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या वर्षी समान तिमाहीमध्ये 585 कोटी रुपयांचा कंपनीने नफा कमावला होता. एकत्रित महसूल जून तिमाहीअखेर 8851 कोटी रुपये इतका कंपनीने कमावला आहे, जो मागच्या वर्षी याच अवधीत 8447 कोटी रुपये इतका होता.
तिमाहीत 13 लाख दुचाकी विक्री
कंपनीचे एकूण उत्पन्नदेखील वाढून 7840 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. पहिल्या तिमाहीच्या कालावधीमध्ये हिरो मोटो कॉर्पने जवळपास 13.53 लाख मोटरसायकल आणि स्कूटरची विक्री करण्यामध्ये यश मिळवले आहे.









