नवी दिल्ली
भारतातील दुचाकी निर्मिती कंपनी हिरो मोटो कॉर्पचा नफा 3 टक्के वाढत 711 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. डिसेंबर अखेरच्या तिमाहीमध्ये सदरचा नफा कंपनीने प्राप्त केला आहे. तज्ञांनी यापूर्वी कंपनी 660 कोटी रुपये नफा कमवू शकते, असा अंदाज वर्तविला होता. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याच्या कारणास्तव या उद्योगाला नुकसान सोसावे लागले आहे. मागच्या दुचाकी कंपनीने वाहनांच्या किमती वाढवून हा भार ग्राहकांवर ढकलला होता. कंपनीने डिसेंबर अखेरच्या तिमाहीत 8 हजार 31 कोटी रुपये महसूल प्राप्त केला आहे. सदरच्या महसुलामध्ये 2 टक्के इतकी वाढ वर्षाच्या आधारावरती दिसली आहे. सदरच्या तिमाहीत कंपनीच्या 12 लाखहून अधिक दुचाकी विक्री झाल्या आहेत.









