नवी दिल्ली :
हिरो इलेक्ट्रिक ए2बी ब्रँड अंतर्गत आगामी काळामध्ये प्रिमियम गटात आपली वाहने उतरविण्याची तयारी करत आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न असणार आहेत. याचाच एक भाग म्हणून ए2बी ब्रँड स्थापित केला असून याच्या अंतर्गत प्रिमियम इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन कंपनी हाती घेणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर आणि इतर नव्या वाहनांचा समावेश असेल. हिरो इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजाल यांनी ही माहिती दिली आहे.
काय म्हणाले एमडी
माहिती देताना नवीन मुंजाल म्हणाले, देशातील इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आगामी काळामध्ये ग्राहकांकडून मागणी वाढणार असून सामान्य गटासह प्रिमियम गटातील वाहनांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनी आगामी काळामध्ये कसोशीने प्रयत्न करणार आहे.









