नवी दिल्ली
अलीकडेच काही ऑटो कंपन्यांनी आपल्या चारचाकी वाहनांच्या किमती वाढवण्याचे ठरवले होते, पण आता दुचाकी वाहन निर्मात्या कंपन्यांकडूनही किमती वाढवण्यात येत आहेत. यात हिरो मोटो कॉर्पचा समावेश झाला आहे.
हिरो मोटोकॉर्प आपल्या दुचाकीच्या किमती 3 ऑक्टोबरपासून वाढवणार आहे. बाईक व स्कूटर गटातील वाहनांच्या किमती 1 टक्के इतक्या वाढणार आहेत. सर्वच वाहनांच्या किमती वाढवणार नसल्याचे कंपनीने सांगितलेले असले तरी कोणत्या मॉडेलच्या किमती वाढणार आहेत याचा खुलासा करण्यात आलेला नाही. महागाई दर, मार्जिन व बाजारातील हिस्सेदारी या सर्वाचा विचार करुन किमती वाढवण्यात आल्या आहेत.
जुलैमध्येही वाढल्या किमती
यावर्षी जुलैमध्ये कंपनीने आपल्या निवडक दुचाकींच्या किमती 1.5 टक्के इतक्या वाढवल्या होत्या. उत्सवी काळात वाहन विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. हे पाहूनच कंपनीने किमती वाढवल्याचे सांगण्यात येत आहे. करिझ्मा एक्सएमआरची किमत 7 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते.









