वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहनांची निर्मिती करणारी हिरो मोटोकॉर्पला आपल्या विजेवर चालणाऱया वाहनांच्या विक्रीसाठी आता ‘हिरो’ ट्रेडमार्कचा वापर करण्यास परवानगी मिळाली आहे. सदरची माहिती हिरो मोटोकॉर्पने शेअर बाजाराला दिली आहे.
दुचाकी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत हिरो इलेक्ट्रिकने हिरो मोटोकॉर्पला आपल्या वाहनांकरीता या ट्रेडमार्कचा वापर करता येणार असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये आगामी काळात ग्राहकांच्या सोयीसाठी याचा लाभ होणार असल्याचे संकेत
आहेत.









